
२१ व्या सुरज अंडर १६ स्पर्धेत जांभळीचा अभय भोसले विजेता
01/03/2025 -नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली व सूरज स्पोर्टस अकॅडेमी, कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि कच्छी जैन भवन, राममंदिर , सांगली याठिकाणी झालेल्या सूरज रॅपिड् १६ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत विक्रमी ५४५ खेळाडूचा सहभाग नोंदवला गेला. सांगलीच्या ईश्वरी जगदाळे व जांभळीचा अभय भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला बुकोल्झ गुणाच्या आधारे अभयने ७.५ गुणासह रू. १५०५०/- च्या रोख पारितोषिकासह सूरज चषक पटकाविला तर ईश्वरीने ७.५ गुणासह रू. १२५००/- च्या रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकाविले. फोटो सौजन्य : नूतन बुद्धिबळ मंडळ